Last Updated: Tuesday, May 28, 2013, 00:06
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीसीबीएसईचे बारावीचे निकाल जाहीर झालेत. यंदाही निकालामध्ये मुलींनीच बाजी मारलीय. सीबीएसईमध्ये तब्बल 88 टक्के विद्यार्थिनी तर 78 टक्के विद्यार्थी पास झालेत. दिल्लीच्या पारस शर्मानं देशात पहिला क्रमांक पटकावलाय. त्यानं 99 गुण मिळवलेत.
चेन्नई विभागाचा सर्वाधिक 92 टक्के तर अलाहाबाद विभागाचा सर्वात कमी 72 टक्के निकाल लागलाय. दिल्लीचा दिवाकर शर्मा आणि कार्तिक साहनी या अंध विद्यार्थ्यांनीही सीबीएसईच्या परीक्षेत उत्तुंग यश मिळवलंय. प्रचंड मेहनत आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी आपल्या अपंगत्वावर मात केलीय.
या दोन्हीही विद्यार्थ्यांनी सीबीएसईच्या परीक्षेत 90 टक्क्यांच्या वर गुण प्राप्त केलेत. दिवाकर शर्मा हा विद्यार्थी केवळ अभ्यासात हुशार नसून तो सारेगम लिटिल चॅम्प्सचा सहभागी कलाकारही आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, May 28, 2013, 00:06