Last Updated: Tuesday, April 29, 2014, 19:45
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईचीनची कंपनी लेनोवोने एस-सिरीजचा स्मार्टफोन एस 860 लॉन्च केला, या फोनची बॅटरी 2 जी कनेकश्नवर 43 तास चालते आणि 3 जी कनेक्शनवर 24 तास चालते, असा दावा कंपनीने केला आहे.
हा फोन दोन सिम कार्डसना सपोर्ट करतो, या फोनमध्ये 720X1280 पिक्सल रिझोल्युशन आहे, तसेच 5.3 इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आलाय.
या फोनमध्ये 2 जीबी एंड्राईड जेली बीन, 2 जीबी रॅम आहे, तसेच 1.3 जीएचझेड क्वाडकोर प्रोसेसर, तसेच 8 एमपी रियर कॅमेरा आणि 16 जीबी स्टोरेज आहे. या फोनची किंमत 21 हजार 500 रूपये आहे.
हा फोन तीन मे पासून उपलब्ध होणार आहे., मॅटेलिक बॉडीचा हा फोन टायटेनियम कलरमध्ये उपलब्ध आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, April 29, 2014, 19:18