Last Updated: Thursday, April 10, 2014, 16:38
www.24taas.com, वृत्तसंस्था, लंडनतुमच्या मोबाईलची बॅटरी अवघ्या 30 सेकंदात चार्ज होणार आहे, 30 सेंकदात चार्ज होणारी मोबाईल बॅटरी डेव्हलप केल्याचा दावा एका कंपनीने केला आहे.
ही कंपनी इस्त्रायलची आहे. या बॅटरीला तेल अवीव येथे झालेल्या एका तंत्रज्ञान प्रदर्शनात ठेवण्यात आलं होतं.
मायक्रोसॉफ्ट थिंक नेक्स्ट संमेलनात इस्त्रायलची कंपनी स्टार्ट-अप स्टोर डॉटने जैविक संरचनेवर ही बॅटरी सादर केली.
प्रदर्शनादरम्यान एका बॅटरीच्या सहाय्याने पूर्णपणे डाऊन झालेली एस 4 स्मार्टफोनची बॅटरी 26 सेकंदात चार्ज कऱण्यात आली.
या बॅटरीला सध्या प्रायोगिक तत्वावर वापरण्यात येत आहे, पुढील तीन वर्षात या बॅटरीला व्यावसायिक रूपात आणण्याचा प्रयत्न आहे.
प्रदर्शनात ठेवण्यात आलेली बॅटरी सिगारेटच्या पाकिटाच्या आकाराची होती, तिला एका स्मार्टफोनला जोडण्यात आलं होतं.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, April 9, 2014, 17:23