भारतात जॅग्वारची सर्वात स्वस्त कार लॉन्च! , Cheap car launch in India, the jegvaraci!

भारतात जॅग्वारची सर्वात स्वस्त कार लॉन्च!

भारतात जॅग्वारची सर्वात स्वस्त कार लॉन्च!
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

लक्झरी कारची आवड असलेल्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लक्झरी कार तयार करणारी कंपनी ‘जॅग्वार लँड रॉवर’ (जेएलआर)ने जॅग्वार एक्सएफ २०१४ मध्ये सर्वात कमी किंमत असलेल्या कारचे मॉडेल भारतीय बाजारपेठेत उतरवले आहे.

जॅग्वार एक्सएफ मॉडेलला २.० लीटर पेट्रोल इंजिन मॉडेलच्या रुपात बाजारात आणले आहे. या कारची किंमत भारतात सुमारे ४८.३० लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. जॅग्वार एक्सएफ २०१४ ही कार देशातील कंपनीच्या १७ शहरांमधील सर्व १९ शोरुममध्ये उपलब्ध आहे.

जॅग्वार एक्सएफ २०१४ या कारची वैशिष्ट्ये :

 या कारमध्ये ८ स्पीड ऑटोमेटिक ट्रांसमिशन सिस्टम आहे.

 या कारचे इंजीन २४० पीएस पावर आणि ३४० एनएम टॉर्क देतो.

 ही कार ताशी २५० किलोमीटर वेगाने धावते.

 ही कार ० ते १०० किलोमीटर अंतर गाठण्यास ७.९ सेकंद इतका वेळ घेते.

 या गाडीचा टॉप माइलेज १०.८ किलोमीटर प्रतिलीटर आहे.

 या कारमध्ये सनरुफ, फुल साइज स्पेयर व्हील, रीयर व्यू कॅमरा आणि नेविगेशन सारख्या आधुनिक वैशिष्ट्ये आहे


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, January 6, 2014, 21:02


comments powered by Disqus