Last Updated: Tuesday, June 11, 2013, 10:29
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईसध्या स्मार्टफोनच्या ग्राहकांची संख्या वाढत आहे. तरीही हे स्मार्टफोन सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीत. मात्र आता कंप्युटर क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी लेनोव्हो नवे स्मार्टफोन आणत आहे. हे स्मार्टफोनची किंमत ५००० रुपयांपेक्षा कमी असेल.
कंप्युटर, लॅपटॉप्स यांशिवाय आता मोबाइल क्षेत्रातही लेनोव्हो जोरदार आगमन करण्याच्या बेतात आहे. ५००० रुपयांपेक्षा कमी किमतीत स्मार्टफोन उपलब्ध झाल्यास या स्मार्टफोन्सची विक्री वाढेल, अशी ‘लेनोव्हो’ला खात्री आहे. साधारण १ दशलक्ष स्मार्टफोन्सची विक्री करण्याचा लेनोव्होचा मानस आहे. कंप्युटर्सच्या क्षेत्रात लेनोव्होचं नुकसान होऊ लागलं आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी मोबाइल क्षेत्रात उतरून ‘लेनोव्हो’ नफा मिळवण्याच्या बेतात आहे.
सध्या उपलब्ध असणारे स्मार्टफोन्स साधारण १०,००० रुपयांपासून सुरू होतात. सॅमसंग, एलजी, नोकिया, कार्बन या कंपन्यांचे मोबाइल्स यात पुढे आहेत. मात्र ‘लेनोव्हो’ने आता आपला मोर्चा स्मार्टफोन्सकडे वळवल्यामुळे या फोन्सच्या किंमतींमधील स्पर्धा वाढणार आहे. या स्पर्धेमुळे ग्राहकांना मात्र स्वस्तात मोबाइल उपलब्ध होणार आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
First Published: Monday, June 10, 2013, 18:18