साखरेनं चार्ज होणार स्मार्टफोनची ब‌ॅटरी, chinese smart phones battery to be charged with sugar

साखरेनं चार्ज होणार स्मार्टफोनची ब‌ॅटरी

साखरेनं चार्ज होणार स्मार्टफोनची ब‌ॅटरी
www.24taas.com, झी मीडिया, न्यूयॉर्क

साखरेच्या साहाय्यानं तुमच्या स्मार्टफोनला तब्बल १० दिवस ऊर्जा देणाऱ्या बॅटरीविषयी ऐकलंत का? नाही ना... पण, अशी बायो-बॅटरी लवकरच अस्तित्वात येणार आहे.

वर्जिनिया टेक नावानं ओळखल्या जाणाऱ्या वर्जिनिया पॉलिटेक्निक तसंच स्टेट यूनिव्हर्सिटीचे संशोधनकर्त्यांनी एका नव्या बायो-बॅटरीची संकल्पना शोधून काडलीय. या बॅटरीची क्षमता सध्या अस्तित्वात असलेल्या आणि बहुतांश इलेक्टॉनिक उपकरणांत वापरल्या जाणाऱ्या लिथियम आयर्न बॅटरीच्या तुलनेत कित्येक पटींनी अधिक आहे.
एक बायो बॅटरी साखरेला विद्युत ऊर्जेत परावर्तित करू शकते. ही बॅटरी आपल्या पचनक्रियेप्रमाणे काम करते. त्यामुळे इलेक्ट्रॉन उत्सर्जित होत साखरेचं कार्बन डायऑक्साईड तसंच पाण्यात विघटन होतं.

वर्जिनिया टेकमध्ये संशोधन करणाऱ्या झिगआंग झू यांच्या म्हणण्यानुसार लिथियम आयर्न बॅटरी तुमच्या फोनमध्ये केवळ एकच दिवस काम करू शकते. भविष्यात यामध्ये साखरेचा प्रयोग इंधनाच्या रुपात करता येऊ शकेल. त्यानंतर मात्र तुमचा स्मार्टफोनची बॅटरी १० दिवसांपर्यंत टीकू शकेल.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, March 3, 2014, 15:28


comments powered by Disqus