भारतीय बाजारात आता येणार चायनिज स्मार्ट फोन!China`s smart phones in the Indian market will knock

भारतीय बाजारात आता येणार चायनिज स्मार्ट फोन!

भारतीय बाजारात आता येणार चायनिज स्मार्ट फोन!
www.24taas.com, झी मीडिया, शांघाय

भारतात स्वस्त स्मार्ट फोनचा बाजार चांगलाच वाढतोय. याच रांगेत आता चायनिज स्मार्टफोन दाखल होणार आहेत. चीनची दूरसंचार कंपनी झेडटीईनं भारतात मोबाईल फोन्ससाठी रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर सुरू करण्याची योजना आखलीय.

यासोबतच कंपनी यंदा भारतात सहा नवे स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. कंपनीनं या स्मार्टफोन्सची किंमत 7000 ते 18000 दरम्यान असेल.

झेडटीई मोबाईल डिव्हाइसचे सीईओ अॅडम जंगनं ही माहिती दिली. त्यांनी म्हटलं की हे नवे फोन 3जी आणि 4जी वाले असतील.

भारतात कंपनी आपले हँडसेट दूरसंचार कंपनीसोबत मिळून बाजारात विकते. कंपनी हँडसेट विकण्यासाठी 4जी कंपन्यांसोबत चर्चा करत आहे. ते म्हणाले ती, कंपनीला भारतात 4जीबाबत खूप आशा आहेत. ते इथं कमी किमतीतले अनेक स्मार्टफोन लॉन्च करेल.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, June 11, 2014, 09:13


comments powered by Disqus