फेसबुकवरील आक्षेपार्ह मजकूराची तक्रार करा, compliant number for unwanted post on facebbok

फेसबुकवरील आक्षेपार्ह मजकूराची तक्रार करा

फेसबुकवरील आक्षेपार्ह मजकूराची तक्रार करा
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

सोशल मीडियावर कुणीही आक्षेपार्ह मजकूर किंवा चित्र टाकल्यास त्याबाबतची तक्रार एसएमएस, फोन कॉल किंवा ईमेलद्वारेही पोलिसांकडे करता येईल.

ही महत्त्वपूर्ण घोषणा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी `झी मीडिया`शी बोलताना केली होती.

विशेष म्हणजे अशा तक्रारदारांची नावे गुप्त ठेवण्यात येतील, असंही गृहमंत्र्यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार आता मुंबई पोलिसांनी तक्रारीसाठी एक मोबाईल नंबर दिलाय.

9820810007 या मोबाईल क्रमांकावर 13 जूनपासून फोन किंवा एसएमएस करून कुणालाही तक्रार नोंदवता येणार आहे.

झी २४ तासवरील `सोशल मीडियाचा ताप` या विशेष कार्यक्रमात बोलताना आर. आर. पाटील यांनी सर्वप्रथम ही घोषणा केली होती.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, June 12, 2014, 22:33


comments powered by Disqus