Last Updated: Sunday, May 26, 2013, 11:55
www.24taas.com, झी मीडिया, भोपाळमध्यप्रदेशमधील सिवनी जिल्ह्यात घुरवाड़ा गावामध्ये तोंडात मोबाईलचा स्फोट झाल्याने २२ वर्षीय तरूण गंभीर जखमी झाला. या मोबाईलच्या स्फोटात त्याच्या झोपडीचे छतही उडाले.
मिथलेश ने आपल्या तोंडामध्ये मोबाईल धरून मोबाईल बॅटरीच्या सहायाने वस्तूची पाहणी करीत होता. याचदरम्यान, तोंडात धरलेला मोबाईलचा स्फोट झाला. स्फोटात त्याच्या तोंडाचा जबडा फाटला तर नाकाची हड्डीलाही जखम झाली. मिथलेशला त्याच्या नातेवाईकांनी महाराष्ट्रातील नागपूर येथील रूग्णालयात दाखल केले आहे. मिथिलेशची परिस्थिती नाजूक आहे.
ज्या मोबाईलचा स्फोट झाला तो चायनीज आहे. ही घटना रात्री ९ ते १० वाजण्याच्या सुमारास घडली. त्यावेळी मिथलेशला सिवनी येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, परिस्थिती नाजूक झाल्याने त्याला तात्काळ नागपूरला हलविण्यात आले. डॉक्टरांनी त्याची परिस्थिती खूप नाजूक असल्याचे सांगितले.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, May 26, 2013, 11:55