अॅन्ड्रॉईड-आयओएसवर डाऊनलोड करा बीबीएम!, download BBM on android & IOS now

अॅन्ड्रॉईड-आयओएसवर डाऊनलोड करा बीबीएम!

<B> अॅन्ड्रॉईड-आयओएसवर डाऊनलोड करा बीबीएम! </B>
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

आत्तापर्यंत केवळ ‘ब्लॅकबेरी’ मोबाईलसाठी उपलब्ध असलेली बीबीएम ही सुविधा आता ‘अॅन्ड्रॉईड’ आणि ‘आयओएस’मध्येही सुरू झालीय. ब्लॅकबेरीनं ही सुविधा नुकतीच लॉन्च केलीय.

‘ब्लॅकबेरी मॅसेंजर’ ही सुविधा लवकरच ‘अॅन्ड्रॉईड’ (सॅमसंग, कार्बन, आयबॉल) आणि ‘आयओएस’मध्येही (अॅपल) उपलब्ध होणार असल्याची घोषणा ब्लॅकबेरीनं मे महिन्यातच केली होती. ब्लॅकबेरीच्या मॅसेंजर या सुविधेमुळे उपयोगकर्ते ब्लॅकबेरी मोबाईलच्या साहाय्यानं दुसऱ्या ब्लॅकबेरी उपयोगकर्त्याला टेक्स्ट मॅसेज, ऑडिओ, व्हिडिओ आणि फोटो पाठवू शकतात. आतापासून ही सुविधा केवळ ब्लॅकबेरीच्याच नाही तर ‘अॅन्ड्रॉईड’ आणि ‘आयओएस’ या ऑपरेटींग सिस्टमचा वापर करणाऱ्सा सर्व मोबाईलमध्ये वापरता येणार आहे. त्यामुळे आता ब्लॅकबेरी मेसेंजर सर्विस जगातील ९० टक्क्याहून अधिक फोनमध्ये उपलब्ध होणार आहे. अॅन्ड्रॉइड युझर्सना गुगल प्लेवरुन इतर अॅप्लिकेशनप्रमाणे बीबीएम डाऊनलोड करता येणार असून आयस्टोरवरुन आयफोनमध्ये हे अॅप डाऊनलोड करता येणार आहे.

सध्या, बीबीएमप्रमाणे वी चॅट, निम्बूझ, व्हॉटस् अॅपसारखे अॅप्लिकेशन्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. हे सगळे अॅप्लिकेशन मोफत उपलब्ध आहेत. ब्लॅकबेरीनंही आपलं ‘बीबीएम’ अॅप्लिकेशन लॉन्चिंगच्यावेळी मोफत उपलब्ध करून देण्याची घोषणा केलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, October 22, 2013, 16:34


comments powered by Disqus