Last Updated: Saturday, September 29, 2012, 11:22
www.24taas.com, लंडनभौतिक शास्त्रात क्रांती घडवून आणणाऱ्या बुद्धिमान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्साइन यांचा मेंदू आयपॅडवर ऍप्लिकेशन म्हणून ९.९९ डॉलर्सला डाऊनलोड करता येऊ शकतो. हे विशेष ऍप्लिकेशन नुकतंच सुरू करण्यात आलंय. आइन्स्टाइनच्या मेंदूच्या मोठ्या प्रतिमेला आधीच्या तुलनेत आणखी सोपं करण्याचं शास्त्रज्ञांनी ठरवलं आहे.
`इंडिपेंडंट.आयई` या बेवसाइटवर दिलेल्या माहितीनुसार१९५५मध्ये आइन्स्टाइनच्या मृत्यूनंतर त्यांच्या मेंदूचे काप केले गेले होते. हे काप सुमारे ३५० नाजूक आणि बहुमूल्य स्लाइडच्या फंडिंग शिकागोमध्ये विकसित केले जात आहे. आइन्स्टाइनचा बुद्ध्यांक हा जगातील सर्वाधिक बुद्ध्यांक होता. एका अर्थी आइन्स्टाइन हा जगातला सर्वांत बुद्धिमान व्यक्ती होता.
नवं ऍप्लिकेशन आता संशोधकांना आणि नवशिक्यांना आइन्स्टाइनच्या मेंदूत डोकावण्याची संधी देत आहे. या स्लाइड्समुळे लोकांना आइन्स्टाइनचा मेंदू मायक्रोस्कोपद्वारे पाहू शकतो.
First Published: Saturday, September 29, 2012, 11:22