फेसबुक अकाऊंटला सुरक्षा, Facebook Account ,Security, Facebook Facebook Account Security

फेसबुक अकाऊंटला सुरक्षा

फेसबुक अकाऊंटला सुरक्षा
www.24taas.com, मुंबई

तुम्हा एकदा लॉगिंग करून ठेवलेले अकाऊंट कायम स्वरूपी ओपन राहू शकत होते. आता त्याला लगाम बसणार आहे. कारण सुरक्षितेच्या नावाखाली फेसबुकने आता सेटींग चेंच करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लॉगिंग करून अकाऊंट सुरू ठेवणे शक्य होणार नाही.

फेसबुकवर पासवर्ड न वापरता साईटला मिळणाऱ्या अॅक्सेसची थेट लिंक काही दिवसांत बंद होणार आहे. तसा निर्णय फेसबुक व्यवस्थापनने घेतला आहे. हा निर्णय फेसबुकचा वापर करणाऱ्यांच्या (युजर्स) अकाऊंटला सुरक्षा पुरविण्यासाठी घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

युजर्स अनेक ई-मेलच्या माध्यमातून फेसबुकमध्ये थेट अक्सेयस मिळवितात. फेसबुकची सध्या ही सेटिंग अस्तित्वात आहे, ती रद्द होणार आहे. अशा लिंकच्या माध्यमातून हॅकर्स युजर्सच्या वैयक्तिक माहितीत फेरफार; तसेच माहितीच्या चोरीचे प्रकार करतात. त्यामुळे यापासून सुटका होण्यासाठी भविष्यात लॉग-इनशिवाय थेट अॅक्सेस मिळणार नाही.

First Published: Sunday, November 4, 2012, 15:53


comments powered by Disqus