फेसबुकच्या या आयडीयाने बदलणार तुमचे जीवन!, Facebook launches new `Home` for Android users

फेसबुकच्या या आयडीयाने बदलणार तुमचे जीवन!

फेसबुकच्या या आयडीयाने बदलणार तुमचे जीवन!
www.24taas.com, न्यू यॉर्क

आता मोबाईलचा वापर पुरेपुर करून घेण्यासाठी फेसबुक लवकरच एक सॉफ्टवेअर बाजारात आणतयं. मोबाईल सतत तुमच्या खिशात असतो पण फेसबुकवर तुमचे मित्र काय करत आहेत ते पाहिला कोणत तरी ऍप उघडून बघाव लागतं.पण तुमची ही समस्या लवकरच दूर होणार आहे.
फेसबुक लवकरच एक असं होम सॉफ्टवेअर आणतय ज्याद्वारे फेसबुक नेटवर्क फिड तुमच्या एंड्रॉइड फोनच्या होमपेजवर पाठवेल. हे सॉफ्टवेअर फक्त एंड्रॉइड फोनवर उपलब्ध होईल. त्यामुळे एंड्रॉइड फोनचा वापर आणखीन वाढेल.’या बदलांमुळे फेसबुकच नव होम सॉफ्टवेअर ऍपला झाकून देईल आणि त्या जागी सोशल नेटवर्कचे सगळे कंटेंट आणि चॅट तुमच्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर दाखवेल, अशी माहिती फेसबुकचा संस्थापक मार्क जुकरबर्ग याने सांगितले.

हे नवीन सॉफ्टवेअर गुगल प्ले स्टोरच्या माध्यमातून डाऊनलोडसाठी उपलब्ध होईल. फेसबुकच हे सॉफ्टवेअर १२ एप्रिलपासून पाच मोजक्याच फोनवरच उपलब्ध होईल. त्यात एचटीसीचे दोन आणि सॅमसंगच्या तीन मोबाईलचा समावेश करण्यात आला आहे.

First Published: Friday, April 5, 2013, 15:52


comments powered by Disqus