येतोय नवा फेसबुकचा स्मार्टफोन! Facebook mulls own smartphone showcasing social network

येतोय नवा फेसबुकचा स्मार्टफोन!

येतोय नवा फेसबुकचा स्मार्टफोन!
www.24taas.com, न्यूयॉर्क

आजकाल, लोक मोबाइलवर कॉलपेक्षा जास्त फेसबुकचा वापर करतात. याचाच विचार करून अनेक स्मार्टफोन्सनी फेसबुक ऍप्स तयार केली. मात्र आता फेसबुकने स्वतःचाच स्मार्टफोन मोबाइल बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. एचटीसी कंनीसोबत करार करून हा मोबाइल बाजारात आणला आहे.

फेसबुकने सोशल नेटवर्किंग साइट्सवर अधिक सहजतेने फोटो पाहाता यावेत, अपलोड करता यावेत, लगेच लाइक करता यावं, यासाठी विशेष सुविधा देणारा स्मार्टफोन बनवला आहे. एचटीसी कंपनीने या स्मार्टफोनचं मॉडेल बनवलं आहे तर गुगलचं अँड्रॉइड सॉफ्टवेअरही यात आहे, अशी माहिती फेसबुकच्या हेडक्वार्टरमधील दोनजणांनी दिली आहे.


या स्मार्टमफोनमध्ये कॅमेरासारखी फिचर्स फेसबुकशी संबंधित ठेवण्यात आली आहेत. लवकरच हा मोबाइल बाजारात येत आहे. या स्मार्टफोनची आणखी काय वैशिष्ट्यं आहेत, याबद्दल लवकरच अधिकृत घोषणा होणार आहे.

First Published: Tuesday, April 2, 2013, 15:45


comments powered by Disqus