‘फेसबुक पोस्ट : जमावाचा आगडोंब थांबवण्यासाठी कारवाई’, facebook post

‘फेसबुक पोस्ट : जमावाचा आगडोंब थांबवण्यासाठी कारवाई’

‘फेसबुक पोस्ट : जमावाचा आगडोंब थांबवण्यासाठी कारवाई’
www/24taas.com,मुंबई

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर पुकारण्यात आलेल्या बंदवर फेसबुर कमेंट करणा-या दोन मुलींच्या अटकप्रकरणाचे पडसाद अद्याप शमलेले नाही. या कारवाईनंतर पोलिसांच्या भूमिकेबाबत जाणकारांकडून समर्थन करण्यात येत आहे. दबावामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

दुसरीकडे आता पोलिसांच्या भूमिकेबाबत जाणकारांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जातायेत. मुळात पोलिसांनी मुलींवर दाखल करून घेतलेली तक्रार चुकीची होती. पोलिसांनी जरी त्या मुलींना चुकीच्या पद्धतीने अटक केली असली तरी न्यायदंडाधिका-यांनी तत्काळ या चुकीची दखल घेऊन त्या मुलींची सुटका करणं अपेक्षित होतं असं मत माजी माहिती आयुक्त शैलेश गांधी यांनी व्यक्त केलय.

याशिवाय इतर जाणकारांनी आपापल्या परीनं या एकूणच प्रकरणावर प्रतिक्रिया दिल्या आहे. त्यावेळची परिस्थीती पाहता जमावाचा दबाव पोलिसांवर आला त्यामुळे सहाजिकच जमावाचा आगडोंब उसळू नये यामुळे त्यांना मुलींवर कारवाई करणं भाग पडलं. मात्र या कारवाईमुळे संपूर्ण फेसबुक कम्युनिटीवर त्याचा परिणाम झाला असंही जाणकारांना वाटतय.

हा दबाव एखाद्या संसर्गजन्य रोगाप्रमाणे सार्वत्रिक झाल्याचीही भावना आहे. ११ ऑगस्टला मुंबईत आझाद मैदानावर निर्माण झालेल्या परिस्थीतींनतर पोलिसांनी संयम बाळगला म्हणून वातावरण शांत झालं असा युक्तीवाद पोलिसांकडून करण्यात आला.

तर यावेळी त्या मुलींची अटक केल्यानं आगडोंब टाळता आला असा युक्तीवाद पोलिसांनी मांडलाय. कायद्याचा योग्य तो अर्थ लावून त्यांची अंमलबजावणी काटेकोरपणे केली तर अशा प्रकारचे प्रसंग टळू शकतात हेच खरे.

First Published: Sunday, November 25, 2012, 11:14


comments powered by Disqus