‘फेसबुक’वरच्या कमेंटसनं तुम्हीही हैराण, तर...,Facebook to start `tiered replies` to make conversations simpler

‘फेसबुक’वरच्या कमेंटसनं तुम्हीही हैराण, तर...

‘फेसबुक’वरच्या कमेंटसनं तुम्हीही हैराण, तर...
www.24taas.com, वॉशिंग्टन

तुम्ही एखादं स्टेटस अपडेट किंवा फोटो टाकला तर त्यावर तुम्हाला प्रतिक्रिया मिळाल्या, तर तुम्ही खुश होता... पण, याच प्रतिक्रियांची संख्या वाढल्यावर मात्र त्या डोकेदुखी ठरतात... बरोबर? फेसबुकच्या अॅडमिनपर्यंत तुमची ही अडचण पोहचलीय. त्यामुळेच त्यांनी यावर उपाय म्हणून फेसबुक लवकरच ‘टायरेड रिप्लाईज’चा ऑप्शन घेऊन येणार आहे.

फेसबुक आता यूजर्सना हा नवीन पर्याय उपलब्ध करुन देणार आहे. सध्या एखाद्या वादग्रस्त फोटोवर किंवा स्टेटसवर कमेंट नेमक्या व्यक्तिसाठी कमेंट टाकायची असल्यास तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव अगोदर लिहावं लागतं, मग त्या कमेंटवर आणखी कोणीतरी कमेंट टाकतं आणि मग सुरू होते कमेंटसची एक लांबलचक यादी... पण, फेसबुकच्या या नवीन पर्यायामुळे मात्र तुम्ही वादग्रस्त स्टेटसवर किंवा फोटोवर वाद घालण्याऐवजी संबंधित व्यक्तीशी चर्चा सुरू करू शकता. साहजिकच, त्यामुळे इतर वादग्रस्त आणि अनावश्यक कमेंटस टळू शकतील.

मात्र, ही सुविधा आपल्या खासगी अकाऊंटला उपलब्ध करून घेण्यासाठी यूजर्सच्या फोलोव्हर्सची संख्या कमीत कमी दहा हजार असावी लागेल. तसंच फेसबुकच्या ‘कव्हर पेज’च्या गाइडलाइन्समध्येही थोडाफार बदल होण्याची शक्यता आहे. कारण, सध्या कव्हर पेजच्या ऑप्शनमुळे फेसबुकला बराचसा मनस्ताप सहन करावा लागतोय. कव्हर पेजवर ‘लाईक’चं बटन असावं अशी विचारणाही होतेय... याच काही गोष्टी लक्षात घेऊन फेसबुक आपल्या ‘फेस’मध्ये काही बदल घडवून आणण्याच्या तयारीत आहे.

First Published: Thursday, March 28, 2013, 16:42


comments powered by Disqus