येत्या तीन वर्षांत `फेसबुक` डुबणार, facebook will end in next 3 years - research

येत्या तीन वर्षांत `फेसबुक` डुबणार...

येत्या तीन वर्षांत `फेसबुक` डुबणार...

www.24taas.com, झी मीडिया, न्यूजर्सी

प्रत्येक भौतिक गोष्टीचा निश्चितच अंत होतो. शून्यापासून सुरुवात केल्यानंतर आलेख वर वर चढत जातो आणि मग एका टप्प्यानंतर त्याला उतरती कळा लागते, हे टप्पे अनेक गोष्टींच्या उत्क्रांतीमध्ये पाहायला मिळतात. एकेकाळी आपल्या लाडक्या असलेल्या `फेसबुक`चंही तेच झालंय.

काही वर्षांपूर्वी `गुगल`चं ऑर्कुट तरुणांमध्ये आणि नेट सॅव्हींध्ये भलतंच लोकप्रिय झालं होतं. त्यानंतर, अचानक `फेसबुक` या सोशल वेबसाईटनं ऑर्कुटचं जग सीमित करत बाजी मारली. तरुणांमध्ये फेसबुकची एकच क्रेझ निर्माण झाली. `व्हॉटस इन युअर माईंड` या प्रश्नाच्या उत्तरात तरुणांनी आपल्या मनातील अनेक गोष्टी एकाच वेळी लोकांशी शेअर केल्या... फोटो शेअर केले... पण, हीच क्रेझ आता काहीशी कमी झाल्याचं तुमच्याही लक्षात आलं असेल.

याच धर्तीवर, फेसबुकच्याही घोडदौडीला एका टप्प्यानंतर अचानक ब्रेक लागेल, असा निष्कर्ष अमेरिकेतील प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी काढलाय. रोगांच्या अभ्यास करणाऱ्या `डिसीज मॉडेल`च्या आधारे सोशल मीडियाच्या जीवनचक्राचा अभ्यास करून या संशोधकांनी हा अंदाज बांधला आहे. त्यांच्या मते, पुढील तीन वर्षांत फेसबुकच्या यूजर्सची संख्या ८० टक्क्यांनी घटेल.

प्रिन्स्टनच्या `मेकॅनिकल अँड एअरोस्पेस इंजिनीअरिंग डिपार्टमेंट`च्या संशोधकांनी नुकताच हा संशोधन अहवाल प्रसिद्ध केला. त्यांच्या मते, लोकांनी ऑनलाइन सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर स्वीकार करणे आणि नंतर त्याकडून दूर वळणे या प्रक्रियांचा अभ्यास `डिसीज मॉडेल`च्या आधारे करता येऊ शकतो. त्यानुसार, `रिकव्हरी`साठी रोग नसलेल्या व्यक्तीच्या - म्हणजेच येथे फेसबुक नॉन-युजरच्या (रिकव्हर झालेल्या व्यक्तीच्या) संपर्कात येणे आवश्यक असते, हे लक्षात घेता फेसबुकचे प्रस्थही लवकरच संपेल आणि २०१५ ते २०१७ या काळात फेसबुक यूजर्सचा आकडा ८० टक्क्यांनी घटेल, असं मत या अभ्यासकांनी नोंदविलंय.

कोणतीही कल्पना किंवा भौतिक गौष्ट ही एखाद्या रोगाच्या संसर्गाप्रमाणे असते... रोग झपाट्यानं पसरतो आणि नंतर विरुन जातो, तसं इतर अनेक भौतिक गोष्टींच्या बाबतीतही असतंच की... असं म्हणत फेसबुकही उत्क्रांतीच्या एका टप्प्यानंतर संपुष्टात येईल, असं या संशोधकांचं म्हणणं आहे.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, January 23, 2014, 09:03


comments powered by Disqus