Last Updated: Monday, October 15, 2012, 19:18
www.24taas.com, मुंबई ‘फोर्ड इंडिया’ या नावाजलेल्या कंपनीनं नवीन ‘फिगो’ लॉन्च केलीय. फोर्डची ही फिगो म्हणजे कंपनीचा एक महत्त्वकांक्षी प्रोजेक्ट आहे.
कायनॅटिक डिझाईन असणारी फिगो ‘कॉम्पॅक्ट कार’ म्हणजे आकारानं छोटी आहे. आज ही गाडी नव्या रंग-रुपात लोकांच्या समोर आणण्यात आली. या गाडीची किंमत आहे ३ लाख ८४ हजार ९९९ रुपये. यामध्ये हेक्साझोनल ग्रील, नव्या आणि आकर्षक पद्धतीनं डिझाईन केलेले हेडलॅम्प ही या गाडीची आकर्षणाची बाजू ठरलीय. याशिवाय अनेक सुविधाही या गाडीत देण्यात आल्या आहेत.
‘फोर्ड फिगो ही गाडी आम्ही खूप विचारअंती बाजारात उतवण्याचा निर्णय घेतलाय आणि अल्पावधीतच या गाडीनं ग्राहकांच्या विश्वास संपादन केलाय. नव्या फिगोमध्ये आम्ही सुविधांवर भर दिल्यामुळे ग्राहकांच्या ही गाडी अधिक पसंतीस पडेल’ असं ‘फोर्ड इंडिया’चे अध्यक्ष मायकल बोनेहॅम यांनी म्हटलंय. टाटाची नॅनो आणि मंगळवारी बाजारात दाखल होत असलेल्या ऑल्टो ८०० सोबत फिगोची स्पर्धा असेल.
First Published: Monday, October 15, 2012, 19:18