Last Updated: Tuesday, April 29, 2014, 18:13
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली `फोर्ड इंडिया` या मोटार कंपनीनं आपल्या `एसयूव्ही` (स्पोर्टस् यूटिलिटी व्हेईकल्स) विभागातील एक नवीन गाडी लॉन्च केलीय. फोर्ड इंडियाच्या या नव्या गाडीचं नाव आहे `इंडेवर`... कंपनीनं याआधी सादर केलेल्या `इंडेवर`ला पुन्हा एकदा नवीन स्वरुपात बाजारात उतरवण्यात आलंय.
या गाडीची दिल्ली शोरुममधील किंमत १९.८४ लाख रुपयांपासून २३.०६ लाख रुपयांच्या दरम्यान आहे. कंपनीनं या गाडीचे तीन मॉडेल बाजारात सादर केलेत.
`फोर्ड इंडिया`चे अध्यक्ष निजेल हॅरीस यांच्या म्हणण्यानुसार, इंडेवर हे एक विश्वसनीय नाव आहे आणि फोर्ड इंडियाच्या उत्पादित पोर्टफोलिओमध्ये या नावाचं विशेष स्थान आहे. २०१४मध्ये इंडेवरला जास्त स्टायलिश, डायनामिक आणि आरामदायी बनवण्यात आल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आलाय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, April 29, 2014, 18:13