फ्री रोमिंगवरून मोबाइल कंपन्यांमध्ये शर्यत Free roaming for mobile

फ्री रोमिंगवरून मोबाइल कंपन्यांमध्ये शर्यत

फ्री रोमिंगवरून मोबाइल कंपन्यांमध्ये शर्यत
www.24taas.com, नवी दिल्ली

मोबाइल कंपन्यांनी एकीकडे दरवाढ सुरू केली असताना एरसेल कंपनीने मात्र मोफत रोमिंगची सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे मोबाइल कंपन्यांमध्ये पुन्हा रोमिंगवरून शर्यत लागणार आहे.

एअरसेलने फ्री रोमिंग सुरू केल्यामुळे देशभरात कुठेही रोमिंगसाठी वेगळे पैसे आकारले जाणार नाहीत. कॉलिंग, एसएमएस आणि डेटाही एकाच किमतीत मिळणार आहे. रोमिंगमधील इनकमिंगही फ्री झालं आहे. मात्र यासाठी मासिक शुल्क ३२ रुपयांनी वाढणार आहे. तर दिल्लीमध्ये ३९ रुपयांनी वाढ होणार आहे.

एअरसेल कंपनीच्या या नव्या सुविधेमुळे इतर टेलिकॉम कंपन्यांचे मात्र धाबे दणाणले आहेत. कारण कुठल्याही टेलिकॉम कंपनीच्या उत्पन्नात साधारण १०% वाटा हा रोमिंगमधून मिळणाऱ्या पैशांचा असतो. एअरसेलच्या या नव्या वन नेशन वन रेट सुविधेला टक्कर देण्यासाठी इतर कंपन्याही तयारी करू लागल्या आहेत.

First Published: Thursday, January 31, 2013, 17:08


comments powered by Disqus