काँग्रेस देणार तरुणांना फ्री `व्हॉट्सअॅप’, Free What`s app from Congress

काँग्रेस देणार तरुणांना फ्री `व्हॉट्सअॅप’

काँग्रेस देणार तरुणांना फ्री `व्हॉट्सअॅप’
www.24taas.com, नवी दिल्ली

२०१४ च्य़ा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने तरुणांची मतं मिळवण्यासाठी अश्वासनं द्यायला सुरूवात केली आहे. भारतातील शहरी टेक्नोसॅव्ही तरुणाईला काँग्रेसतर्फे ‘व्हॉट्सअॅप’ हे अॅचप्लिकेशन मोफत देण्यात येणार आहे.

व्हॉट्सअॅप मॅसेंजर हे सध्या मोबाइल फोनवर सर्वाधिक वापरलं जाणारं चॅटिंग अॅप्लिकेशन आहे. हे काही काळापुरता फअरी मिळत असलं तरी कालांतराने त्यावर शुल्क आकारलं जातं. काँग्रेसने मात्र हे अॅप्लिकेशन तरुणांना मोफत देण्याचं अश्वासन दिलं आहे. हे अश्वासन काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी दिलं आहे. ही योजना डायरेक्ट कॅश ट्रान्सफरसारखीच असल्याचं मनीष तिवारींचं म्हणणं आहे.


काँग्रेस या योजने अंतर्गत 'व्हॉट्सअॅप'ला पैसे देणार आहे. त्यामुले व्हॉट्स अॅपची सेवा तरुणांना फ्रीमध्ये मिळणार आहे. तसंच ज्यांनी हे अॅप विकत घेतलं आहे, त्यांचेही पैसे काँग्रेस भरणार आहे. साधारण ५० रुपये मासिक शुल्क या अॅपसाठी भरावं लागतं. हा खर्च काँग्रेस करून तरुणांचं मत मिळवण्याच्या प्रयत्नात आहे.

First Published: Thursday, March 7, 2013, 16:10


comments powered by Disqus