Last Updated: Wednesday, October 3, 2012, 21:07
www.24taas.com, लंडनशुक्र ग्रहावर अत्यंत थंडगार वातावरण असणारं ठिकाण आढळल्याची माहिती शास्त्रज्ञांकडून मिळाली आहे. शुक्रावर कार्बन डायऑक्साईड हिमरुपात अस्तित्वात असल्याचं मानलं जातंय. यूरोपिय अंतराळ एजंसीने `व्हिनस एक्सप्रेस सेटेलाइट`चा वापर करून पाच वर्षे अभ्यास करून शुक्र ग्रहाबद्दल हा निर्णय निकालात आणला आहे.
ग्रहाच्या पृष्ठभागापासून ते १२५ किलोमीटर वर वातावरण अतिशय थंड आहे. कार्बन डायऑक्साईडचे अधिक प्रमाण असल्यामुळे बर्फ तयार झाला असेल असे मानले जातंय. ‘डेली मेल’ अनुसार असं स्पष्ट करण्यात आलयं की सूर्यापासून अधिक जवळ असूनही पृथ्वीच्या वातावरणापेक्षा शुक्रावरील तापमान अतिशय थंड आहे.
‘बेल्जिअन इंस्टिट्यट फॉर स्पेस एअरोनॉमी’चे अर्नाद माही यांनी सांगितलं, की थोड्या उंचीवर सीओटूच्या बिंदुंमुळे तापमान खूप कमी असतं. या कारणास्तव शुक्रावर कार्बन डायऑक्साईड बर्फाच्या स्वरूपात आढळतो.
First Published: Wednesday, October 3, 2012, 21:07