Last Updated: Thursday, June 12, 2014, 13:24
www.24taas.com, झी मीडिया, रांची एक तरुण आणि एक तरुणी... ट्रेनमध्ये भेटले... फेसबुकवर त्यांचं प्रेम फुललं... आणि त्यानंतर तरुणीनं प्रेमाखातर आपलं घरही सोडलं... पण, तरुणाचं खरं रुप समोर आल्यानंतर मात्र तिला चांगलाच धक्का बसला.
ही फिल्मी स्टोरी घडलीय रांचीला राहणाऱ्या एका तरुणीसोबत... उज्जैनला राहणाऱ्या प्रवीण कुर्मी याच्यासोबत तिचं सुत जुळलं आणि एक दिवस तिनं त्याच्या हातात हात घालून घरही सोडलं... त्यानंतर पोलिसांच्या मदतीनं तिला पुन्हा एकदा आपलं घर गाठावं लागलं.
संबंधित 23 वर्षीय तरुणी उज्जैनला राहणाऱ्या भावाला भेटण्यासाठी आपल्या आई-वडिलांसोबत रेल्वेनं जात असताना तिची प्रवीणशी ओळख झाली. गप्पा करता करता प्रवीणशी तिची चांगलीच गट्टी जमली. त्यानंतर तिची आणि प्रवीणची बऱ्याचदा फेसबुकवरून गप्पा सुरू होत्या... आणि 19 मे रोजी संबंधित तरुणी आपल्या आई-वडिलांना न सांगता तिनं प्रवीणच्या सांगण्यावरून घर सोडलं. यावेळेस तिचे वडील जमशेदपूरला गेले होते. शेजाऱ्यांच्या सांगण्यावरून मुलीनं एका तरुणासोबत घर सोडल्याचं त्यांना घरी परतल्यानंतर समजलं.
त्यानंतर तरुणीच्या भावानं फेसबुकवर सर्च केलं तेव्हा त्याला हे संपूर्ण प्रकरणाची उकल झाली. मोबाईल लोकेशनच्या आधारावर पोलिसांनी उज्जैन गाठलं. प्रवीणनं तरुणीला इंदौरच्या एका होस्टलमध्ये ठेवलं होतं.
आरोपी प्रवीण मध्यप्रदेशच्या उज्जैन जिल्ह्यात माधवनगरचा रहिवासी आहे. प्रवीण विवाहीत असून त्याला एक सहा वर्षांची मुलगीदेखील आहे. असं असूनदेखील त्यानं संबंधित तरुणीला भूलथापा मारून प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. पोलिसांनी त्याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल केलाय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, June 12, 2014, 13:24