गुगलची ही शक्कल भारी... १० जीबी अटॅचमेंट धाडी, Gmail adds support for 10GB Google Drive attachments

गुगलची ही शक्कल भारी... १० जीबी अटॅचमेंट धाडी...

गुगलची ही शक्कल भारी... १० जीबी अटॅचमेंट धाडी...
www.24taas.com, नवी दिल्ली

खूप अर्जंट मेल करायचाय... आणि योग्य अटॅचमेंट ‘जी मेल’वर अपलोडच होत नाहीए... ती दहा जीबीपेक्षा मोठी आहे, आणि म्हणून ती एव्हढा त्रास देतेय, असं जेव्हा तुम्हाला उमजतं.... अशा वेळी उमटलेल्या अनेक तीव्र प्रतिक्रिया तुम्ही दिल्या किंवा असतील. पण, आता तुम्हाला यातून दिलासा देण्याचं ‘जी मेल’नं ठरवलंय.

‘जी-मेल`वरून एखादी अटॅचमेंट पाठविताना २५ ‘एमबी’च्या (मेगा बाईट) मर्यादेची अडचण आता जाणवणार नाही. कारण जी मेल यूजर्स आता १० ‘जीबी’पर्यंत (गेगा बाईट) अटॅचमेंट अपलोड करू शकणार आहे. ‘गुगल’नं नुकतीच गुगल ड्राईव्ह आणि जी मेल यांच्या इंटीग्रेशनची घोषणा केलीय. त्यामुळे हे सहज शक्य होणार आहे.

लवकरच, तुमच्या ‘कम्पोझ मेल’मध्ये ‘इन्सर्ट फाईल्स युझिंग ड्राईव्ह’ असा पर्याय दिसू लागेल. ड्राईव्हमधील प्रत्येक फाईलचे स्वतंत्र शेअर सेटींगही असेल. हे सेटींग तुम्ही फाईलप्रमाणे बदलू शकता. ही सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे आता जी-मेल युजर्सना आता मोठी अटॅचमेंट पाठवण्यासाठी आता तुम्हाला दुसऱ्या वेबसाईटची गरज भारणार नाही.

First Published: Thursday, November 29, 2012, 11:51


comments powered by Disqus