आई-बाबांनो नो स्टेन्शन... इंटरनेटवरील अश्‍लील छायाचित्रे ब्लॉक ?, Google and Microsoft pledge to block child pornography

आई-बाबांनो नो स्टेन्शन... इंटरनेटवरील अश्‍लील छायाचित्रे ब्लॉक ?

आई-बाबांनो नो स्टेन्शन... इंटरनेटवरील अश्‍लील छायाचित्रे ब्लॉक ?
www.24taas.com, वृत्तसंस्था, लंडन

आई-बाबांनो तुमची मुलं जास्तवेळ इंटरनेटवर बसत असतात का? तुम्ही नेहमी काळजीत असाल, मुलं नेटवर सर्च करून अश्लील फोटो पाहतील म्हणून. मात्र, आता काळजी करू नका. गुगलने त्यांच्या सर्च इंजिनवरून अश्‍लील छायाचित्रे ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला आहे.

अल्पवयीन मुले गुगल आणि मायक्रोसॉफ्ट बिंगचा वापर करून अश्‍लील छायाचित्रे पाहतात त्यामुळे या दोन्ही साईटस्ने अशा छायाचित्रांवर बंदी घालावी अशी मागणी ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरॉन यांनी केली होती. या मागणीला गांभीर्याने घेत गुगलने हा निर्णय घेतला आहे. गुगलने त्यांच्या सर्च इंजिनवरून अश्‍लील छायाचित्रे ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला आहे.

गुगलने १५० भाषांमधील सर्चमधून अश्‍लील छायाचित्रे ब्लॉक केली आहेत. यापुढे अशी छायाचित्रे सर्च केल्यास ‘नो रिझल्ट’ असा मेसेज येणार आहे ,असे गुगलचे कार्यकारी अध्यक्ष एरिक यांनी स्पष्ट केलं. या मागणीवर तोडगा काढण्यासाठी गुगल आणि मायक्रोसॉफ्ट या प्रतिस्पर्धी कंपन्या एकत्रितपणे एक सॉफ्टवेअर तयार करणार आहेत असेही त्यांनी सांगितले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, November 19, 2013, 12:48


comments powered by Disqus