स्मार्टफोनवर आपले हस्ताक्षर google increases handwriting support for indian languages in android app

Google Androidमाध्यमातून स्मार्टफोनवर आपले हस्ताक्षर

Google Androidमाध्यमातून स्मार्टफोनवर आपले हस्ताक्षर
www.24taas.com, वृत्तसंस्था, वॉशिंग्टन

गुगलने अॅंड्रॉईड आधारित फोनसाठी ट्रान्सलेट अॅप अनेक भारतीय भाषांमध्ये आणले आहे. आता यात भर टाकत हॅण्डराईटिंग सपोर्टही सुरू केला आहे. त्यामुळे आपण बोटांच्या सहायाने आता आपल्या भाषेत लिहू शकणार आहोत.

काही नविन भारतीय भाषांमध्ये आणखी भाषा जोडल्या जाऊ शकणार आहेत. गुजराती, कन्नड, पंजाबी, तमिळ आणि तेलगू भाषांचा या समावेश आहे. त्याआधी हिंदी, मराठी भाषा अनुवादीत करता येत होत्या. आता अंगठा किंवा बोटांच्या मदतीने आपल्या भाषेत लिहीता येणार आहे.

गुगल प्लेच्या मदतीने याचे अपडेट उपलब्ध होतील. यामुळे अॅंड्रॉईडच्या युजर्स आपल्या स्मार्टफोनच्या डिस्प्लेवर बोटांच्या सहाय्याने किंवा स्टायलिश पेनने या सर्व भाषेत तुम्ही लिहू शकता.

गुगल सर्चमध्येही बदल करण्यात आले आहेत. गुगल सर्च, गुगल मॅप्स, गुगल वॉलेट यांच्यातही बदल करण्यात आले आहेत. हे सर्व अपडेटस् क्रमबद्ध प्रमाणे जारी केले जाणार आहेत.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.


झी २४ तासला ट्विटरवर फोलो
करा.

First Published: Tuesday, March 18, 2014, 12:32


comments powered by Disqus