Last Updated: Monday, December 10, 2012, 12:08
www.24taas.com, मुंबई बिट्स पिलानी या शिक्षणसंस्थेत कम्प्युटर सायन्स इंजिनीयरिंगचे शिक्षण घेणाऱ्या तीन भारतीय विद्यार्थ्यांना गुगलनं प्रत्येकी १.२२ कोटी रुपये पगाराचं पॅकेज ऑफर केलंय. मुंबईचा ऋषभकुमार, नागपूरचा कुणाल लाड आणि उत्तर प्रदेशच्या नितीन घंगार यांना ही ऑफर मिळालीय.
दरम्यान, नुकतंच आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्याला आणखी एका कंपनीनं तब्बल ८१ लाखांच्या नोकरीची ऑफर दिली होती. कॅम्पस इंटरव्ह्यूमधून त्याला ही लॉटरी लागली होती. त्याच्यापाठोपाठ आणखी एकाला ५४ लाखांचे पॅकेज मिळालं होतं. कॅम्पस रिक्रुटमेंटसाठी यंदा सॅमसंग, गुगल व मायक्रोसॉफ्टसह तब्बल १६० कंपन्यांनी हजेरी लावली होती.
गुगलनं २,२५,००० हजार डॉलर्सचं (१.२२ कोटीं रुपये) हे भारतीय विद्यार्थ्यांना दिलेलं पॅकेज यंदाचं सर्वात मोठं जॉब पॅकेज ठरलंय. ऋषभकुमार, कुणाल आणि नितीनला गुगलच्या हेड ऑफिसला म्हणजेच कॅलिफोर्नियातील माऊंटन व्ह्यूमध्ये ऑक्टोबर २०१३ पूर्वी कामावर हजर व्हायचंय.
First Published: Monday, December 10, 2012, 10:13