Last Updated: Monday, May 20, 2013, 18:48
www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टनइंटरनेटवर अनेक वेबसाइट्सवर सिनेमाची गाणी ऐकली जातात, तसंच डाऊनलोड करता येतात. विशेष करून यासाठी यूट्युबचा वापर जास्त केला जातो. मात्र आता गुगलवरच गाणी ऐकण्याची सोय करण्यात आली आहे.
गुगल प्ले ही म्युझिक सेवा गुगलने लाँच केली आहे. याद्वारे सर्च करतानाच आपल्याला आपली आवडती गाणी ऐकायला मिळतील. तसंच संगीतावर श्रोत्यांच्या प्रतिक्रियाही ऑनलाइन मिळवता येतील. गुगल प्ले रेडिओसारखं ऐकता येणार आहे. मात्र यात कुठलाही अडथळा अथवा बफरिंग नसेल. गुगलवरील या सेवेमुळे आयट्यून्स, एक्सबॉक्स, पँडोरासारख्या म्युझिक सेवा देणाऱ्या वेबसाइट्स आणि ऍप्सना स्पर्धा होणार आहे. यासाठी गुगलकडे जगभरातल्या लाखो गाण्यांचा संग्रह करण्यात आळा आहे.
मात्र ही म्युझिक सेवा केवळ पहिल्या महिन्यातच फ्री असणार आहे. त्यानंतर गाणी ऐकण्यासाठी दरमहा १० डॉलर्स म्हणजेच ५५० रुपये इतके शुल्क भरावे लागणार आहे. ही रक्कम दर महिन्याला एक रकमी भरावी लागणार आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइन करा. झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, May 20, 2013, 18:48