गुगल प्लसने आणली नवीन ऍप्स Google plus brings new apps

गुगल प्लसने आणली नवीन ऍप्स

गुगल प्लसने आणली नवीन ऍप्स
www.24taas.com, वॉशिंग्टन

फेसबूकला टक्कर देण्यासाठी गुगलने गुगल प्लस बाजारात आणलं. याला सुरूवातीच्या काळात फारसा प्रतिसाद मिळाला नसला, तरी आता गुगल प्लसने आपलं स्थान बळकट करण्यास सुरूवात केली आहे.

गूगल प्लस वापरणाऱ्यांची संख्या आता १३.५ कोटी झाली असल्याचे गुगलने सांगितलं आहे. यामध्ये आता सुधारणा करत नवनवीन ऍप्स जोडायला सुरूवात केली आहे. यामध्ये फेसबुकच्या इंस्टाग्रामसारख्या सुविधा उपलब्ध करून फोटो पलोड करण्याच्या सुविधा सुरू केल्या आहेत.

गुगलचे वरिष्ठ उपाध्यक्ष विक गुन्डोत्रा यांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये सांगितलं, ‘आज गुगल प्लस सगळ्यात वेगाने पसरत आहे.’ सध्या १३.५ कोटी युजर्स सक्रिय आहेत. गुगल अकाउंटची मेंबरशिप घेणाऱ्यांची संख्या आता ५० कोटी झाली आहे. हे सर्व सदस्य गुगल प्लस वापरू शकतील. याद्वारे गुगल फेसबुकला स्पर्धा देण्याचा प्रयत्न करत आहेत.

First Published: Sunday, December 9, 2012, 20:23


comments powered by Disqus