गूगलचं हॅकिंग चॅलेंज, २७ लाख डॉलरचं बक्षिस!Google to give away $2.7 mn at Pwnium hacking contest

गूगल हॅक करा, २७ लाख डॉलर मिळवा!

गूगल हॅक करा, २७ लाख डॉलर मिळवा!
www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली

सर्च इंजिन गूगलनं नवी ऑफर ठेवलीय. ती म्हणजे जो कोणी त्याचं ब्राऊजरवरील ऑपरेटिंग सिस्टिम क्रोम ओएस हॅक करेल , त्याला गूगलकडून २७ लाख डॉलर बक्षिस मिळेल.

कंपनीची ही ऑफर म्हणजे मार्च महिन्यात होणाऱ्या प्वनियम हॅकिंग स्पर्धेअंतर्गत करण्यात आलीय.

गूगलनं एका ब्लॉगमध्ये लिहिलंय, क्रोमियमसाठी सुरक्षेचं खूप महत्त्व आहे म्हणूनच सुरक्षेचबाबत अधिक शिकण्यासाठी ही स्पर्धा नेहमी आयोजित करण्यात येते. या स्पर्धेमुळं क्रोमियम आधीपेक्षा जास्त सुरक्षित होईल.

`वर्ल्ड हॅकिंग स्पर्धा प्वनियम-४` यंदा कॅनडाच्या वॅन्कूवर इथं होईल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, January 27, 2014, 10:44


comments powered by Disqus