३९ पॉर्नोग्राफीक साईट बंद !, Govt bans 39 pornographic sites

३९ पॉर्नोग्राफीक साईट बंद !

३९ पॉर्नोग्राफीक साईट बंद !
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

इंटरनेट माध्यम जवळपास सर्वांपर्यंत पोहोचल्याने त्याचा चांगला वापर होत असताना वाईटही होऊ लागला आहे. देशात मोबाईलच्या माध्यमातून इंटरनेटचा वापर होऊ लागलाय. त्याचा वाईट परिणामही दिसून आल्याने केंद्र सरकारने ३९ पॉर्नोग्राफीक साईट बंद करण्याचे निर्देश दिलेत.

वाईट गोष्टींचा अतिरेक झाल्याने सरकारने कडक पावले उचलण्यास सुरूवात केलेय. याच धर्तीवर सरकारने ३९ पॉर्नोग्राफीक साईट बंद करण्याचे ठरवले. अशा प्रकारचे कायदेशार आदेशही देण्यात आलेत.

दूरसंचार विभागाने इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरर्सला (आयएसपी) आदेश दिले. १३ जूनपासून पॉर्नोग्राफीक फाईल्स डाऊनलोड करण्यासाठी वापरण्यात येणारे यूआरएल आणि फोटो पुरविणाऱ्या इंटरनेटच्या ३९ वेबसाईट बंद करण्यात याव्यात. मात्र, बंदी घातलेल्या या वेबसाईट भारताबाहेरुनच चालवण्यात येतील आणि अमेरिकेच्या १८ यूएससी २२५७ला त्या चालविण्याचा हक्क देण्यात आलाय.

वेबसाईटवर बंदी घालण्याबाबतचा कोणताही कायदा अथवा नियम अद्याप नाही. तसेच कायदाही करण्यात आलेला नाही. त्यामुळे किती साईट बंद होतील याबाबत शंका आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, June 26, 2013, 14:21


comments powered by Disqus