Hand finger will identify, बोटाचे ठसे ठरविणार तुमची ओळख

बोटाचे ठसे ठरविणार तुमची ओळख

बोटाचे ठसे ठरविणार तुमची ओळख
www.24taas.com,मुंबई

तुमची फसवणूक टाळण्यासाठी तसचे कोणाला दुसऱ्याची फसवणूक करायची असेल, तर ते आता शक्य होणार नाही. कारण बोटाचे ठसे तुमची ओळख स्पष्ट करणार आहे. ओळखीचा पुरावा हा बोटाचे ठसे असणार आहेत.

आता तुम्हाला बॅंक अकाउंट उघडायचं असो किंवा विमा अथवा मोबाइल कार्ड घ्यायचे असेल तर तिथे फोटो, रेशनकार्ड अशा पुराव्यांसाठी गरज असते. मात्र, यातून तुमची लवकरच सुटका होणार आहे.

`आधार` कार्डचा प्रकल्प राबविणाऱ्या युआयडी प्राधिकरणाने त्यासाठी `केवायसी` ( नो युवर कस्टमर ) ही इलेक्ट्रॉनिक यंत्रणा तयार केली आहे. या यंत्रणेमुळे कोणत्याही ठिकाणी केवळ बोटाच्या ठशांवरून आपली ओळख पटविता येणे शक्य होणार आहे.

केंद्र सरकार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि अन्य सरकारी संस्थांनी `आधार` ला ओळखपत्र म्हणून मान्यता दिल्यानंतर पुढील महिन्यापासून ` केवायसी ` योजनेची अमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यानुसार बँका, सरकारी कार्यालये आणि अन्य कंपन्यांमध्ये `आधार` यंत्र बसविले जाणार आहे.

या `आधार` यंत्रावर बोटांचे ठसे दिले की तुमची सर्व माहिती क्षणात उपलब्ध होईल. त्यामुळे तुम्हाला पळापळ करावी लागणार नाही. यातून नागरिकांची ओळख पटविली जाईल. सुरुवातीला बँक, मोबाइल कंपन्या, विमा कंपन्यांत ` केवायसी ` ची अमलबजावणी होणार आहे . त्यानंतर पासपोर्ट देण्यासाठीही या प्रणालीचा वापर होणार आहे.

First Published: Saturday, October 20, 2012, 22:51


comments powered by Disqus