तुमच्या फोनमध्ये `हार्टब्लीड` असेल तर सावधान, heart bleed bug danger for Android phone

तुमच्या फोनमध्ये `हार्टब्लीड` असेल तर सावधान...

तुमच्या फोनमध्ये `हार्टब्लीड` असेल तर सावधान...

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

`हार्टब्लीड` हे गुगलचं बग तुम्हीही तुमच्या अँन्ड्रॉईड फोनमध्ये इन्स्टॉल केलं असेल तर सावधान... कारण, खुद्द गुगलनंच या बगमुळे तुमच्या अँन्डॉईड फोनला सर्वाधिक धोका असल्याचं जाहीर केलंय.

गुगलच्या सुरक्षा विभागात काम करणाऱ्या नील मेहता याने `हार्टब्लीड` बग शोधून काढला. हा बग अँड्रॉइडची ४.०.१ म्हणजेच `आयस्क्रीम सँडविच` ही ऑपरेटिंग सिस्टिम आणि या पुढच्या सर्वच व्हर्जनसाठी धोकादायक आहे. अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिममध्ये ओपन एसएसएलचे १.०.१ हे व्हर्जन वापरण्यात आलेले आहे. याच व्हर्जनमध्ये `हार्टब्लीड` आढळल्यामुळे अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमला धोका निर्माण झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

`ब्लू बॉक्स सिक्युरिटी` या कंपनीनं याबाबत एक सर्व्हेक्षण केलं होतं. यामध्ये, अँड्रॉइडच्या ४.१.१ या किट कॅट व्हर्जनला `हार्टब्लीड`चा सर्वाधिक धोका असल्याचं म्हटलं गेलंय. यावर वेळेत उपाय शोधले नाही तर सर्वाच्या मोबाइलमधील माहिती सायबर हल्लेखोरांना सहजच चोरता येऊ शकेल.

दरम्यान, हार्टब्लीड या बगमुळे तमाम इंटरनेट विश्व हादरून गेलेले असताना आयफोन, आयपॅड आणि मॅकबुक मात्र सुरक्षित असल्याचा दावा `अॅपल`ने केला आहे.

तुमच्या फोनमध्येही हा बग असेल तर काय कराल...
तुमचा फोन या बगपासून किती सुरक्षित आहे किंवा नाही याबाबत जाणून घेण्यासाठी `ब्लूबॉक्स सिक्युरिटी`नं `हार्टब्लीड स्कॅनर` नावाचे एक मोफत अॅपही तयार केले आहे. याचा वापर करून आपला फोन सुरक्षित आहे की नाही? हे आपल्याला समजू शकतं.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, April 15, 2014, 15:30


comments powered by Disqus