Last Updated: Wednesday, April 16, 2014, 18:13
www.24taas.com, झी मीडिया, नेदरलँडरस्त्यांच्या बाजूला स्ट्रीट लाईट लावले जातात, ज्यामुळे रात्री रस्त्यांवर प्रकाश राहिल आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होणार नाही. मात्र नेदरलँडमध्ये एक अनोखा रस्ता बनवण्यात आला आहे.
या रस्त्याच्या आजूबाजूला लाईट लावले नसले, तरीही हा रस्ता स्वयंम प्रकाशित होतो. कारण हा रस्ता रात्री चकाकतो आणि रस्त्यांच्या आजूबाजूला स्ट्रीट लाईट लावण्याची गरज पडत नाही.
हा रस्ता 500 मीटर रूंद आहे. हा हायवे एक वेगळ्या तंत्रज्ञानाने बनवण्यात आला आहे, हा रस्ता रात्री आठ तास चमकतो आणि प्रकाशमान होतो. या रस्त्याला जो पेंट करण्यात आला आहे, त्यासाठी एक खास पावडर वापरण्यात आली आहे, ज्यामुळे चारही बाजूंना प्रकाश पडतो, ही पावडर सूर्य प्रकाशात चार्ज होते आणि रात्री प्रखर प्रकाश देते.
या हायवेवर या वर्षीच वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. एम्सटर्डमपासून दक्षिण-पूर्व बाजूला या हायवे जवळजवळ 100 किलोमीटर दूर आहे.
इंटरॅक्टीव्ह आर्टिस्ट डान रूसगार्ड यांनी डल सिव्हिल इंजीनियरिंग फर्म `हायमांस` सोबत हे तंत्रज्ञान आणलं आहे. वीज वाचवण्यासाठी सरकार रात्रीचे लाईटस बंद ठेवते, आता वीज महत्वपूर्ण झाली आहे, हा रस्ता पूर्णपणे सुरक्षित आहे.
आपण कार्ड डिझायनिंग आणि रस्त्यांवर लाखो रूपये खर्च करतो, मात्र आपण रस्त्यांवर लक्ष देत नसल्याचं रूसगार्ड यांनी म्हटलंय.
जेलीफिशकडून त्यांना ही आयडिया सुचली, जेलीफिशकडे कोणतंही सोलर पॅनल नसतं, पण जेलीफिश नेहमी चकाकत असते.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, April 16, 2014, 18:13