Last Updated: Monday, April 14, 2014, 18:49
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईस्मार्टफोनमध्ये अनेक फिचर असतात त्यामुळे बॅटरी लवकरच संपते. ही समस्या आपल्या सगळ्यांना जाणवते. तुम्हांला वाटते की तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लवकरच संपते, तर तुम्ही खालील उपाय करा त्यामुळे तुमची बॅटरी अधिक काळ टिकेल.
१) या गोष्टी ऑफ ठेवाअ) ब्लूट्यूथ आणि वायफायस्मार्टफोनचे वायफाय तेव्हाच ऑन करता जेव्हा तुम्ही त्याचा वापर करीत असाल. वायफाय रेंजच्या बाहेर जर फोन गेला तर फोन वाय-फाय सिग्नल शोधत असतो. त्यामुळे बॅटरी खर्च होती. जीपीएसचा वापर तुम्ही कधी-कधीच करतात. अशात त्याला ऑफ ठेवा. जीपीएस नेहमी ऑन ठेवल्यास त्याने बॅटरी खर्च होते. वाय-फाय ऑफ करण्याची पद्धत - Settings-Wireless Settings-WiFi-off
आ) अॅनिमेशनतुमच्यासाठी बॅटरी सर्वात गरजेची गोष्ट असेल तर अशा वेळी सर्व अॅप्लिकेशनमधील अॅनिमेशन बंद करता. स्टाइल तर कम होईल पण तुमची बॅटरी लाइफ वाढले. यासाठी Settings-Developer Options-Drawing मध्ये जाऊन सर्व अॅनिमेशन ऑफ करा. किंवा Animation Scale कमी करा.
इ) मोबाइल डाटालो बॅटरीमुळे फोन एकदम बंद होत असेल आणि चार्ज करणे शक्य नसेल तर Mobile Data Off करा. फोन चालत राहील, पण इंटरनेटसंबंधी सेवा काम नाही करणार हे मात्र नक्की
ई) लोकेशन सर्व्हिसेसयासाठी (Settings-Locations Services) मध्ये जाऊन सर्व बॉक्सचे टिक मार्क काढून टाका. लोकेशन सर्व्हिसेस ऑन राहिल्यास, फोनची लोकेशन ट्रॅक करताना बॅटरी अधिक खर्च होते. गरज असल्यास काही काळासाठी तुम्ही लोकेशन सर्व्हिस ऑन करू शकतात.
2. हे कमी करा.- स्क्रीनचा ब्राइटनेसस्क्रीन सर्वात जास्त बॅटरी खातो. स्क्रीन जेवढी मोठी असते, जेवढी चमकदार आणि हाय रेझ्युल्युशनची असेल तेवढी त्याची जास्त पॉवर संपते. तुमच्या फोनमध्ये स्क्रीन ब्राइटनेससाठी ऑटो मोड असेल, तर त्याचा वापर करा. नाही असेल तर ब्राइटनेसला 50 टक्क्यांच्या आसपास ठेवा. यामुळे बॅचरी कमी खर्ची पडते. याचा आणखी एक फायदा की तुमच्या डोळ्यांवरही कमी ताण पडतो. खास गरज पडल्यास म्हणजे उन्हात फोटो किंवा व्हिडिओ पाहण्यासाठी ब्राइटनेस वाढवू शकतात.
- स्क्रीन टाइमआउटस्क्रीन टाइमआउटचा अर्ध आहे, की काही नाही करत असल्यास स्क्रीनची लाइट किती वेळानंतर आपोआप बंद होईल. तुमच्या फोनचा स्क्रीन टाइम आउट जितका कमी तेवढी बॅटरी जास्त चालते. याला कमी करण्यासाठी Settings-Sound & Display-Screen timeout मध्ये जाऊ शकतात.
कॅमरा आणि व्हिडिओचा वापर जेव्हा फोनची बॅटरी कमी होते. तेव्हा कॅमेरा आणि व्हिडिओचा वापर विचारपूर्वक करा. या दोघांच्या वापरमुळे जास्त बॅटरी खर्ची पडते. फोन गरम झाल्यास समजू जा की तुमची बॅटरी अधिक खर्च होत आहेत. त्याला आरामाची गरज हे.
3. यापासून वाचा- व्हायब्रेशनरिंगटोनच्या आवाजाच्या तुलनेत व्हायब्रेट होण्यासाठी फोनला अधिक ताकद लागते. यासाठी गरज नसल्यास फोन व्हायब्रेशन मोडवर ठेवू नका. त्याला डिसेबल करा. यासाठी Settings-Sound and Display-PhoneVibrate
- लाइव्ह वॉलपेपरफोनच्या स्क्रीनवर पोहणारा मासा असेल किंवा त्या सारखे दुसरे लाइव्ह वॉलपेपर तुम्ही वापरत असाल तर तुम्ही बॅटरी अधिक खर्च होते. या ऐवजी डार्क कलरचा फोटो वॉलपेपर म्हणून वापरल्यास कमी बॅटरी खर्च होते.
- व्हिजेट्स विजेट्स सामान्यपेक्षा मोट्या साइजचे असे आयकॉन असतात. की जे तुमच्या फोनची स्क्रीनवर जास्त जागा व्यापतात. हवामानाचा अंदाज सांगणारे किंवा फेसबुक आणि ट्विटरचे व्हिजेट्स असतील ते अधिक बॅटरी खर्च करतात. आपोआप अपडेट होणारे व्हिजेट्स जास्त बॅटरी खर्च करतात. फोनच्या होम स्क्रीनवर अप्सच्या आयकॉनची गर्दी करू नका. जे अप तुम्ही वापरत नाही असे आयकॉन होम स्क्रिनवर ठेऊ नका. गरज पडल्यास मेन्यूमध्ये जाऊन ते अप्स ओपन करा.
दोन अँटीव्हायरस फोनमध्ये दोन अँटीव्हायरसचा वापर करू नका. काही व्यक्तींना वाटते की दोन अँटीव्हायरस फोनला अधिक सुरक्षित करतात. असे नसून फोन अधिक सुस्त बनतो आणि बॅटरी खातो.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, April 14, 2014, 18:44