Last Updated: Thursday, October 31, 2013, 15:15
www.24taas.com, झी मीडिया, पुणेदेशातील तिसऱ्या क्रमांकाचं नेटवर्क असा दावा करणाऱ्या आयडिया सेल्युलरनं स्मार्ट फोनच्या मार्केटमध्येही प्रवेश केलाय. आयडियानं `अल्ट्रा` हा नवा ३जी स्मार्ट फोन पुण्यात लॉन्च केला.
५ इंच इतकी मोठी स्र्किन, ड्यूएल सीम , १.२ जीएचझेड क्वॉड कोअर प्रोसेसर, अँड्रॉईड जेली बिन (४.१.२) ओएस, ८ मेगापिक्सेल कॅमेरा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सलग १० क्लिक्स करण्याची क्षमता हे या स्मार्ट फोनचं खास फिचर म्हणता येईल.
राज्यातील एक हजार आऊटलेटमध्ये सध्या हा फोन विक्रीकरता उपलब्ध आहे. या फोनची किमंत साडे दहा हजार इतकी आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, October 31, 2013, 08:51