Last Updated: Friday, February 15, 2013, 11:32
www.24taas.com, लंडनहृदयविकारग्रस्त चिमुरड्याचे शरीर तब्बल ४ दिवस गोठवून ठेवून त्याचा जीव वाचविण्याची करामत लंडन येथील डॉक्टरांच्या अनोख्या तंत्रामुळे शक्य झाली आहे.
एडवर्ड आईव्हीस या बालकाला जन्मजात सुप्रा व्हेंट्रीकोलर टॅचीकार्डिया हा हृदयविकार होता. या विकारात त्याच्या हृदयाचे प्रतिमिनिटाला ३००हून अधिक ठोके पडत होते. यामुळे त्याच्या जीविताला धोका निर्माण झाला असता.
गेल्या ऑगस्टमध्ये त्याचा जन्म झाला. या बालकाला डॉक्टरांनी कोल्ड जेलच्या ब्लँकेटमध्ये गुंडाळले. त्यामुळे शरीराचे तापमान ३७ डिग्री सेल्सिअसवरून ३३.३ डिग्री सेल्सिअस इतके होऊन तीव्र रक्तदाबामुळे शरीरातील अवयवाची होणारी हानी टळली.
डॉक्टरांनी त्याची तपासणी करून एकूण ४ दिवस त्याला गोठविले. या दरम्यान त्याला डेफीब्रीलीटेरच्या सहाय्याने शॉक देण्यात आले. चौथ्या दिवशी त्याच्या हृदयाचे ठोके स्थिर झाले. त्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर एक महिन्याने एडवर्डला घरी सोडण्यात आले.
First Published: Friday, February 15, 2013, 11:32