Last Updated: Wednesday, November 27, 2013, 12:58
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई मुंबईतील लोकलची गर्दी पाहिल्यावर नको हा रेल्वेचा प्रवास अशी म्हण्याची वेळ तुमच्यावर येते. तिकिट अथवा पास काढण्यासाठी तासंनतास तिकिट खिडकीसमोर उभे राहावे लागत. मात्र, यातून तुमची आता सुटका होणार आहे. तुमच्याकडे मोबाईल आणि इंटरनेट कनेक्शन असेल तर ते पुरेसे आहे. आता मोबाईलच्या माध्यमातून पास देण्याची योजना रेल्वे आखत आहे.
त्यामुळे रेल्वेचा मासिक पास काढण्यासाठी प्रवाशांची तिकीट खिडकीसमोर रांगेत उभे राहण्याच्या कटकटीतून सुटका होणार आहे. प्रवाशांना सहज पास मिळवता यावा म्हणून मुंबई विकास महामंडळ ‘मोबाईल इंटरफेस’ योजना तयार करत आहे. या योजनेमुळे मोबाईलवरून प्रवाशांना पास सेवा उपलब्ध होऊन प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात वेळ वाचणार आहे.
त्यासाठी प्रवाशांना मोबाईल बँकिग आणि डेबिड कार्डचा वापर करता येणार आहे. पास काढण्याची प्रक्रिया पूर्ण होताच मोबाईलवर एसएमएस येईल. त्यामध्ये पासचा कालावधी आणि पासची किंमत दिसेल. प्रवाशांच्या मागणीनुसार त्याबाबतचा ई-मेल ही पाठवण्यात येईल. मोबाईल रेल्वे पास योजना आमलात आण्यासाठी मोबाईल कंपन्यांशी तसा करार करण्यात येणार आहे.
First Published: Wednesday, November 27, 2013, 12:58