भारताकडून अमेरिकेला सणसणीत चपराक, India successfully launches cutting-edge cryogenic rocket

भारताकडून अमेरिकेला सणसणीत चपराक

भारताकडून अमेरिकेला सणसणीत चपराक
24taas.com, झी मीडिया, मुंबई

इस्त्रोने रविवारी जियोसिनक्रोनस सॅटेलाईट लॉन्च व्हेकल जीएसलव्ही ५ चं सफल प्रक्षेपण केलं. यात सर्वात महत्वाचं म्हणजे भारतीय बनावटीचं क्रायोजेनिक इंजिन होतं.

या इंजिनची चाचणीही या निमित्ताने झाली आणि भारत अंतराळ विज्ञानात शक्तिशाली देशांच्या रांगेत जाऊन बसलाय.

हे इंजिन विकसित करण्यासाठी भारताला वीस वर्ष लागली. भारताने हे तंत्रज्ञान आपला शेजारी देश रशियाकडून घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अमेरिकेने दबाव आणल्याने, रशियाने हे तंत्रज्ञान भारताला दिलं नाही.

हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी वीस वर्ष मेहनत घेतली. दोन हजार किलो वजनाचा उपग्रह प्रक्षेपित करायचा असेल, तर क्रायोजेनिक इंजिनची सर्वात जास्त गरज पडते.

क्रायोजेनिक इंजिनमुळे ३६ हजार किलोमीटर दूर कक्षेत उपग्रह स्थिरावण्यासाठी क्रायोजेनिक इंजिनची ताकद महत्वाची ठरते.

या सफल परीक्षणानंतर म्हणता येईल की, भारत अंतराळ विज्ञानात जगातील महत्वाच्या देशांच्या रांगेत जाऊन बसला आहे. भारत जेव्हा आपलं चंद्रयान अभियान २ सुरू करेल तेव्हाही जीएसएलव्हीची गरज पडणार आहे.

भारत आपली सैन्याची ताकद वाढवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा गैरवापर करेल, असं कारण सांगून अमेरिकेने भारताला या तंत्रज्ञानापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता.

मात्र भारताने अग्नि-५ चं दोन वेळेस सफल परीक्षण करून दाखवलं, अग्नि ५ भारताने क्रायोजेनिक इंजिन नसल्याने, रॉकेट इंधनने चालवून दाखवलं.

भारताने नेहमीच आपण क्रायोजेनिक इंजिनचा वापर असैन्य गरजांसाठी वापरणार असल्याचं सांगितलं आणि अंतराळ कार्यक्रमासाठी पहिल्यांदा क्रायोजेनिक इंजिनचा वापरही केला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, January 6, 2014, 10:03


comments powered by Disqus