`व्हॉटस अप`वर डौलानं फडकला `तिरंगा`, Indian flag on whats app

`व्हॉटस अप`वर डौलानं फडकला `तिरंगा`

`व्हॉटस अप`वर डौलानं फडकला `तिरंगा`
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

सध्याच्या युगात ‘कम्युनिकेशन’चं सर्वात वापरातलं साधन म्हणजे ‘व्हाटस अप’… इंटरनेटच्या माध्यमातून ‘व्हाटस अप’वरून एकमेकांशी संवाद साधण्यासाठी हे मोबाईल अॅप्लिकेशन अल्पावधीतच भारतातही लोकप्रिय ठरलं. याच ‘व्हॉटस अप’वर भारतीयांना एक सुखद धक्का बसला जेव्हा भारताचा ‘तिरंगा’ त्यांना डौलात फडकताना दिसला.

होय, सोशल मीडियावर आपले अधिराज्य गाजविणाऱ्या `व्हॉट्स अप`वर अखेर भारताचा राष्ट्रध्वज `तिरंगा` फडकलाय. मेसेजिंगच्या दुनियेत तरुणांच्या मनात अधिराज्य गाजवणार्या ‘व्हॉट्स अप’वर अनेक देशांचे राष्ट्रध्वज आहेत, पण, त्यामध्ये भारतीय राष्ट्रध्वजाचा समावेश नव्हता. यासाठी अनेक दिवसांपासून भारतीय यूर्जसची भारताच्या झेंड्याचा व्हॉट्स अपमध्ये समावेश करून घ्या, अशी जोरदार मागणी चालू होती. अनेकांनी तर यासाठी व्हॉट्स अपच्या कंपनीला मेलही केले होते. अखेर या सर्व प्रयत्नांना यश आलं आणि तिरंगा व्हॉट्स अपवर फडकला.

‘व्हॉट्स अप’वर तिरंग्यासोबत आणखी २२ झेंड्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये भारत, ब्राझिल, मेक्सिको, यूएई, दक्षिण आफ्रिका, अज्रेंटिना, इराण, ब्रिटन, नायजेरिया, कोलंबिया, नेदरलॅण्ड, इजिप्त, स्वित्झर्लंड, सिंगापूर, कॅनडा, थायलॅण्ड, आयलॅण्ड, हाँगकाँग, चिली, सौदी अरेबिया या राष्ट्रांचा समावेश आहे. नव्याने केलेल्या अपडेटमुळे आता ‘व्हॉट्स अप’वरील झेंड्यांची संख्या ३३ झाली आहे. युर्जसना तिरंगा आपल्या ‘व्हॉट्स अप’मध्ये घ्यायचा असल्यास त्यांना आपले ‘व्हॉट्स अप’ अपडेट करावे लागणार आहे.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, January 1, 2014, 12:19


comments powered by Disqus