Last Updated: Monday, November 5, 2012, 18:57
www.24taas.com, वॉशिंग्टनसोशल नेटवर्किंग साइट ‘फेसबुक’ वापरणाऱ्या सुमारे १०० कोटी युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच एक नवी योजना निर्माण होत आहे. ज्यामुळे कॉफी शॉपमध्ये तुम्हाला इंटरनेट वापरताना ‘वाय-फाय’चा पासवर्ड विचारावा लागणार नाही.
फेसबुकच्या स्थानिक व्यापारासाठी नवी वाय-फाय स्पॉट सर्व्हिस सुरू होणार आहे. यामुळे युजरला फेसबुकवर लॉग इन केल्यावर तात्काळ इंटरनेट कनेक्शन मिळणार आहे.
डिस्कव्हरी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार फेसबुकनेही या बातमीला दुजोरा दिला आहे. यामुळे व्यावसायिकांना चांगलाच फायदा होणार आहे, तर फेसबुकही या मार्गाने पला व्यापार वाढवणार आहे. तसंच संबंधित पेजचा मालक वाय-फाय सेवेचा वापर करून आपल्या पेजला किती लाइक्स मिळाले आहेत, ते ही तपासू शकतो.
First Published: Monday, November 5, 2012, 18:57