दीर्घकाळ बॅटरी टिकणारा इंटेक्सचा ‘अॅक्वा ऑक्टा’!Intex launches India`s first octa-core smartphone Aq

दीर्घकाळ बॅटरी टिकणारा इंटेक्सचा ‘अॅक्वा ऑक्टा’!

दीर्घकाळ बॅटरी टिकणारा इंटेक्सचा ‘अॅक्वा ऑक्टा’!
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

स्मार्टफोन म्हटलं की बॅटरी लवकर संपणार हे समीकरणच झालंय. मात्र यावरच उपाय म्हणून इंटेक्स कंपनीनं दीर्घकाळ बॅटरी टिकणारा स्मार्टफोन ‘अॅक्वा ऑक्टा’ बाजारात आणलाय. खासकरून तरुणाईसाठी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील युर्जसंना भुरळ घालणारा हा स्मार्टफोन आहे.

१.७ गिगाहर्टस एमटी ६५९२ ऑक्टा कोअर चिपसेट आणि दोन जीबी रॅममुळं हा फोन सुसाट वेगानं चालेल, असा कंपनीचा दावा आहे. त्यात अँड्रॉईड ४.२ जेलीबीन ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात आली आहे. तसंच या मोबाईलमध्ये दोन सिम टाकता येणार आहेत.

या मोबाईलची स्क्रीन ६ इंची आहे. २३०० एमएएच बॅटरीच्या जोरावर हा फोन सहा तासांचा टॉकटाईम आणि १८० तासांच्या स्टॅण्डबायची खात्री देतो. अॅक्वा ऑक्टामध्ये एलईडी फ्लॅशसोबतच १३ मेगापिक्सल कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

या फोनची इंटर्नल स्टोरेज क्षमता १६ जीबी असून ती ३२ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. तसंच ऑक्टा कोअर प्रोसेसरवर चालणारा हा देशातील पहिलाच मोबाईल असल्याचा दावा कंपनीनं केला आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, January 8, 2014, 16:08


comments powered by Disqus