एक `हॅक` न होणारा पासवर्ड! , its never gonna password hack

एक `हॅक` न होणारा पासवर्ड!

एक `हॅक` न होणारा पासवर्ड!

www.24taas.com, झी मीडिया, दुबई

ऑनलाईन अकाऊंट हॅक होण्याच्या प्रश्नाला आता पूर्णविराम मिळणार आहे. आपला पासवर्ड जपून ठेवण्यासाठी आणि आपल्या खात्यांना सुरक्षित ठेवण्याची धडपड यामुळे संपुष्टात येईल.

एका कम्प्युटर वैज्ञानिकानं ऑनलाईन खात्यांना वाचविण्यासाठी आणि हॅकर्सपासून दूर ठेवण्यासाठी एक उपाय सुचविलाय. या युक्तीला त्यानं `जिओग्राफिकल पासवर्ड` असं नाव दिलंय. त्यामुळे आता तुम्हाला चिंता करण्याची गरज उरणार नाही.

जिओग्राफिकल पासवर्डसचा अविष्कार संयुक्त अरब अमीरात स्थिर रास अल खमाच्या `झेडएसएच-रिसर्च`चे कम्प्युटर वैज्ञानिक झियाद अल-सलौम यांनी शोधून काढलाय. याद्वारे वेगवेगळ्या संस्थांना एक सरळ आणि व्यवहारिक पासवर्ड दिला जातो ज्याद्वारे सुरक्षित पद्धतीनं देवाण-घेवाण होऊ शकते. सोबतच यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या पासवर्डशी संबंधित धोका कमी होतो.

`झेडएसएस-रिसर्च`मध्ये विकसित केलेल्या प्रोटोटाईप सिस्टम एखाद्या सिस्टममधून पासवर्ड माहिती करून घेतल्यानंतर निर्माण होणाऱ्या धोक्यांपासून वाचविण्यासाठी सक्षम आहे. अल सलौम याच्या म्हणण्यानुसार, एखादा कठिण पासवर्डपेक्षा तुम्ही फिरुन आलेल्या एखाद्या जागेचं नाव लक्षात ठेवणं खूपच सोप्पं आहे. पारंपरिक पासवर्डऐवजी प्रभावी पासवर्ड प्रस्तुत करून डाटा सुरुक्षित ठेवणं सोप्पं आहे.

`जिओग्राफिकल पासवर्ड सिस्टम`मध्ये आपल्या आठवणीतील जागेच्या देशांतर, अक्षांश, उंची, सीमा क्षेत्र, कोण इत्यादी उत्पन्न भौगोलिक माहितीचा प्रयोग केला जाऊ शकतो. याप्रकारे जरी दोन उपभोगकर्त्यांनी एकाच जागेचा वापर आपला पासवर्ड म्हणून केला तरी त्यांची पासवर्ड सेटींग मात्र एकमेकांपासून भिन्न असेल. हा शोध सुरक्षा आणि नेटवर्क्सच्या आंतरराष्ट्रीय पत्रिकेत प्रकाशित झालाय.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, February 18, 2014, 18:45


comments powered by Disqus