अॅपलचा पाच हजारांचा `जनता मॉडेल`!, janta model by apple

अॅपलचा पाच हजारांचा `जनता मॉडेल`!

अॅपलचा पाच हजारांचा `जनता मॉडेल`!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

स्मार्टफोनचं फॅडनं सध्या चांगलाच वेग घेतलाय. त्यामुळे कंपन्यांमध्येही कमीत कमी किंमतीत जास्तीत जास्त उपयुक्तकारक फिचर्स देणाऱ्या ‘स्मार्टफोन’ची स्पर्धा वाढतेय.

सध्या सॅमसंगच्या स्मार्टफोनची मार्केटमध्ये चलती आहे. अॅपलचे फोन अधिक सुविधा देणारे असले तरी ते अनेकांच्या खिशाला परवडणारे नाहीत. ही गोष्ट ध्यानात घेऊन आता अॅपलनं कमीत कमी किंमतीतला स्मार्टफोन बाजारात आणण्याची धडपड चालवलीय. सॅमसंगच्या कमी किंमतीत स्मार्टफोन च्या खेळीला जोरदार टक्कर देण्याच्या तयारीने ही कंपनी स्पर्धेत उतरलीय. ‘अॅपल’चा केवळ पाच हजार रूपयांचा ‘जनता मॉडेल’ हा आयफोन लवकरच बाजारात दाखल होणार आहे. साधारणत: वर्षभरात हा आयफोन बाजारात येईल.

जनता मॉडेल हा ‘आयफोन-५’ सारखाच दिसायला आहे आणि त्याची किंमत आहे ९९ डॉलर. या आयफोनसाठी स्वतंत्र सॉफ्टवेअरची निर्मिती करण्यात आलीय. या स्वस्त आयफोनची स्क्रीन मोठी असणार का? या माहितीबद्दल अॅपलचे सीईओ टिम कुक असे म्हणतात, ‘मोठ्या स्क्रीनचे काही तोटेही असतात. लोकांना मोठा डिस्प्ले फोन आवडत असला तरी महत्त्वाचं म्हणजे योग्य कलरचे रिझोल्युशन येत आहे का? त्याचे व्हाईट बॅलन्स ठीक आहे का? तसंच त्याचं रिफ्लेक्टीविटी आणि बॅटरी लाईफ पाहणंही गरजेचं असतं’.

अॅपलचं हे ‘जनता मॉडेल’ प्लॅस्टिक चेसिंगसहीत असेल. पाच-सहा रंगांमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध होऊ शकेल.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, June 15, 2013, 14:48


comments powered by Disqus