जियोनी स्लिमफोन भारतात लाँच Jioni launch new slim phone in india

जियोनी स्लिमफोन भारतात लाँच

जियोनी स्लिमफोन भारतात लाँच
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

भारतात स्लिमफोन विकण्याची सुरवात झाली आहे. जियोनी ईलाइफ S5.5 आता भारतात देखील मिळणार आहे. याची किंमत २२ हजार ९९९ रूपये इतकी आहे. कंपनीच्या वेबसाइटवर हा सेलफोन विकण्यासाठी उपलब्ध आहे. वेबसाइटवर सफेद रंगात या स्मार्टफोनची विक्री होत आहे. जियोनी इंडियाचा दावा आहे की, भारतीय बाजारात व्यापारासाठी उतरताच कंपनीने ५० कोटींचा उद्योग केला आहे.

या स्मार्टफोनचं एन्ड्रॉईड व्हर्जन ४.२ आहे. तर हा फोन कस्टमाइज्ड अमिगो २.० ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. हा स्मार्टफोन मेटल बॉडीचा असून, ५ इंच फूल एचडी सुपर एमोलेडचा आहे.

या स्मार्टफोनचा कॅमेरा १३ मेगापिक्सलचा रियर असून, पुढचा कॅमेरा ५ मेगापिक्सलचा आहे. फ्रंट कॅमेराचं वैशिष्ट म्हणजे यात ९५ डिग्री अल्ट्रा वाइड लेन्स आहे. याचा उपयोग फुल बॉडी सेल्फी काढण्यासाठी होऊ शकतो.

स्मार्टफोनची मेमरी १६ जीबी असून, स्मार्टफोनमध्ये २ जीबी रॅम आहे. या फोनला नॉन-रिमूवेबल बॅटरी आहे, म्हणजेच या स्मार्टफोनची बॅटरी काढता येणार नाही. या बॅटरीची क्षमता 2300mAh इतकी आहे. चीनच्या बाजारात विक्री केल्यानंतर जियोनीने भारतात पहिल्यांदाच स्मार्टफोन लाँच केला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, May 11, 2014, 18:16


comments powered by Disqus