Last Updated: Wednesday, April 30, 2014, 12:50
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली भारतातील प्रचलित कंपनी कार्बननं एक स्वस्त ड्युअल सिम स्मार्टफोन बाजारात आणला आहे. स्मार्टफोनचं नाव `टायटेनियम S1 प्लस` ठेवण्यात आलं असून, या फोनमध्ये खूपच चांगले फीचर्स देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनची किंमत ५ हजार ७४९ रूपये इतकीच ठेवण्यात आली आहे.
हा स्मार्टफोन पुर्णपणे अॅन्ड्रॉइड ४.३ वर आधारीत आहे. स्मार्टफोनचा रॅम १ जीबी आहे. तसंच यात ४ जीबीची स्टोरेज क्षमता आहे. या स्मार्टफोनला ३२ जीबी माइक्रो एसडी कार्ड सपोर्ट करतं. स्मार्टफोनची स्क्रीन ४ इंच असून, ती पूर्ण टीएपटी एलसीजी आहे. याचं रिजॉल्यूश ८००x४८० आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये लाइट, एक्सेलेरोमीटर आणि प्रॉक्सिमिटी सेंसर आहे.
या टायटेनियम स्मार्टफोनमध्ये दोन कॅमेरा आहेत. याचा फ्रंट कॅमेरा वीजीए आहे आणि बॅक कॅमेरा ५ मेगापिक्सलचा आहे. याच्या अन्य फिचर्समध्ये ३जी, २जी, वाय-फाय, जीपीएस आणि ब्लूटुथ आहे. या स्मार्टफोनची बॅटरी १५०० एमएएच असून, ती ४ तास टॉक टाईम देते.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, April 30, 2014, 12:50