Last Updated: Wednesday, October 16, 2013, 15:17
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली सणासुदीच्या मुहूर्तावर आपल्या उत्पादनांची विक्री वाढवण्यासाठी मोबाईल हँडसेट निर्माता कंपनी ‘कार्बन’नं एकाच वेळेस चार मोबाईल बाजारात आणलेत. हे चारही फोन टूजी आणि थ्रीजी नेटवर्कला सपोर्ट करणारे स्मार्टफोन आहेत... आणि महत्त्वाचं म्हणजे या चारही फोनची किंमत ही ग्राहकांच्या खिसाला परवडणारीदेखील आहे.
‘सणांच्या दिवसांत कार्बन उपभोक्त्यांसाठी कंपनीनं चार नवे फोन लॉन्च केलेत. त्यामुळे तुम्हाला जर कुणाला भेटवस्तू द्यायची असेल तर तुमच्यासाठी हा स्मार्टफोन उत्तम ऑप्शन असू शकतो’ असा उल्लेख कंपनीनं आपल्या एका जाहीरातीतही केलाय. या स्मार्टफोनची किंमत ५,५०० रुपयांपासून ते ७,५०० रुपयांपर्यंत आहे.
कंपनीचे कार्यकारी अधिकारी शशिन देवसरे यांच्या म्हणण्यानुसार, आजच्या जमान्यात स्मार्टफोनचा बाजार तेजीत आहे... आणि हीच संधी साधून बाजारातील आपला हिस्सा वाढवण्याचा कंपनीचा मानस आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, October 16, 2013, 15:17