LG G3 फोनचं लॉन्चिंग 27 मे रोजी LG G3 leaks continue with a pair of new renders

LG G3 फोनचं लॉन्चिंग 27 मे रोजी

LG G3 फोनचं लॉन्चिंग 27 मे रोजी

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

एलजी जी 3 या फोनचं लॉन्चिंग 27 मे रोजी करण्यात येणार आहे, सॅन फ्रॅन्सिस्को, न्यूयॉर्क आणि लंडनमध्ये हे लॉन्चिंग होईल, मुख्य समारोह 28 मे रोजी कोरियाची राजधानी सोलमध्ये होईल. सिंगापूर आणि इस्तांबूलमध्येही हा फोन लॉन्च होणार आहे.

हे स्मार्टफोन जी सिरीजचे आहेत, LG G3 या स्मार्ट फोनचा स्क्रीन 5.5 इंचचा आहे. या फोनचं रिझोल्युशन पिक्सेल आहे. तसेच क्वालकॉम स्नॅपड्रॅगन MSM 8974 प्रॉसेसर आहे. या फोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा शक्तिशाली कॅमेरा देण्यात आला आहे. फ्रंट कॅमेरा 2.1 मेगापिक्सेलचा आहे.

3जीबी DDR3 रॅमही जबरदस्त आहे. यात 32 जीबी इंटरनल मेमरी आहे. यात 64 जीबी एक्सपैंडेबल मेमरी आहे. तसेच हा आधुनिक एंड्रॉयड 4.4.2 किटकॅटने चालणारा फोन आहे. हा फोन गोल्ड कलर रंगात आहे, या फोनची किंमत अजून स्पष्ट झालेली नाही.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, May 4, 2014, 18:33


comments powered by Disqus