‘एलजी-जी२’... बनवणार ‘लाईफ गुड’, LG INTRODUCING NEW SMART PHONE G2

‘एलजी-जी२’... बनवणार ‘लाईफ गुड’

‘एलजी-जी२’... बनवणार ‘लाईफ गुड’
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

दक्षिण कोरियास्थित ‘एलजी’ या कंपनीचा नवा स्मार्टफोन बाजारातल्या स्पर्धेत उतरण्यासाठी सज्ज झालाय. ‘एलजी-जी२’ हा स्मार्टफोन लवकरच मार्केटमध्ये दिसणार आहे.

‘स्मार्टफोन – एलजी-जी२’ हा सुरुवातीला अमेरिकेच्या मार्केटमध्ये लॉन्च होईल. या फोनची किंमत मात्र अजूनही गुलदस्त्यात ठेवणंच कंपनीनं पसंत केलंय.

या हाय-स्पीड फोनचा क्वॉलकॉम क्वाईड-कोर स्नॅपड्रॅगॉन ८०० चिपसेटची क्षमता २.२६ गिगाहर्टझ एव्हढी आहे. ‘जी२’ हा अॅन्ड्रॉईड फोन असून जेली बीन ४.२.२. इतकी त्याची क्षमता आहे. या फोनची फूल एचडी स्क्रिन (१०८० x १९२०) ५.२ इंचाची आहे. तर या फोनचा डिसप्ले ४२३ पिक्सल पर इंच एवढा आहे. या फोनचा कॅमेरा १३.० मेगापिक्सल आहे तर फ्रन्ट कॅमेरा २.१ मेगापिक्सल एवढा आहे.

‘एलजी-जी२’ चे फिचर्स...

* ५.२ इंचाचा फूल एचडी डिसप्ले

* २.५ गिगाहर्टझ क्वॉलकॉम क्वाईड-कोर स्नॅपड्रॅगॉन

* अॅन्ड्रॉईड ४.२.२ जेली बीन

* २ जीबी रॅम

* १३.० मेगापिक्सल कॅमेरा

* २.१ मेगापिक्सल पुढचा कॅमेरा

* ३,००० mAh Li-po बॅटरी

* १६जीबी / ३२ जीबी इंटरनल स्टोअरेज

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, August 8, 2013, 17:05


comments powered by Disqus