एलआयसीमध्ये नोकरीची संधी, LIC Housing Finance Limited in the recruitment

एलआयसीमध्ये नोकरीची संधी

एलआयसीमध्ये नोकरीची संधी
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

एलआयसी हाऊसिंग फायन्सास लिमिटेडमध्ये आपल्याला नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. एलआयसीमध्ये १०० रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. एलआसीमध्ये सहाय्यक पदाच्या जागा भरण्यात येणार आहे.

देशातील अनेक विभागात वेगवेगळ्या प्रादेशिक विभागानुसार ही भरती होणार आहे. मध्य पूर्व विभाग १५, पूर्व विभाग १०, नैऋत्य विभाग १०, दक्षिण सर्वसाधारण विभाग २०, दक्षिण पूर्व विभाग १५, दक्षिण विभाग १५, पूर्व विभाग १५ आदी जागा भरण्यात येणार आहेत.

इथं ऑनलाईन अर्ज उपलब्ध
ऑनलाई अर्जपाहण्यासाठी क्लिक करा


जाहिरात पाहा
जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा

मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी घेतलेल्या युवकांना या नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. पदवी प्राप्त युवक नोकरीसाठी अर्ज करू शकतील. मात्र, किमात ५० टक्के गुण आवश्यक आहेत. या नोकरीसाठी एक ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे.

या सहाय्यक पदासाठी २१ ते ३५ वयोगटातील उमेदवार पात्र असतील. अर्जदार उमेदवारीची जन्मतारीख २ फेब्रुवारी १९७८ या आधीची नसावी. तर १ फेब्रुवारी १९९३ नंतरची नसावी. वेतन श्रेणी - ७४००-११६४५- ६५० (२)- १२९४५ -७९०(३)- १५३१५-८२५ (२)-१६९६५

अधिक माहिती http://www.lichousing.com/lichousing/careers/jobs.asp या संकेतस्थळावर मिळेल.

ऑनलाईन नोंदणी : रजिस्ट्रेशन आणि शुल्क भरण्याची तारीख १२ मार्च २०१४ असून शेवटची तारीख : २७ मार्च २०१४ आहे.

पाहा जाहिरात
एलआयसीमध्ये नोकरीची संधी


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, March 6, 2014, 13:29


comments powered by Disqus